पदाधिकारी-कार्यकर्ते यांना कह्यात घेतले !

बेळगाव (कर्नाटक) – राज्याचे शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी शाळांमध्ये हिजाब परिधान करण्यास अनुमती दिल्याच्या निषेधार्थ श्रीराम सेनेच्या वतीने शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भगवे वस्त्र देण्यात येणार होते. यासाठी शहरातील ‘कन्नड साहित्य भवना’च्या परिसरात जमा झाले. याला पोलिसांनी विरोध करत श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना भगवे वस्त्र वाटण्यास मनाई केली आणि पदाधिकारी-कार्यकर्ते यांना कह्यात घेतले.

या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना श्रीरामसेना जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर म्हणाले, ‘‘कर्नाटकातील काँग्रेस सरकार मतपेढीच्या राजकारणासाठी हिजाबला समर्थन देत आहे. यातून समाजात मतभेद निर्माण होत आहेत. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश अनिवार्य असतांना सरकार एका विशिष्ट समुदायाला प्राधान्य देत आहे आणि हिंदूंवर अन्याय करत आहे.’’ (राज्यघटनेनुसार निधर्मी व्यवस्था असून शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश असतांना मुसलमान विद्यार्थिनींना हिजाबला अनुमती का ? असे करून काँग्रेस जाणीवपूर्वक मुसलमानांचे लांगूलचालन करत आहे ! – संपादक)
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !