नागपूर येथे ५० देशी दारूच्या अड्डयांवर पोलिसांच्या धाडी !

५० आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंद !

नागपूर – येथील पोलिसांनी ५० देशी दारूच्या अड्डयांवर धाडी घातल्या. या वेळी लाखो रुपयांची देशी दारू, तसेच मोहफुलाची दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी ५० आरोपींच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत. अनेक आरोपी स्वतःच्या घरातून किंवा झोपडपट्टी परिसरातून अवैध दारूची विक्री करत असल्याचे उघड झाले.

पोलिसांनी विविध ठिकाणांहून देशी दारूच्या ८६३ बाटल्या जप्त केल्या, तर १९३ लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. जप्त केलेल्या मद्यसाठ्याची पडताळणी करण्यात येत असून काही प्रकरणांत मद्याचा पुरवठा करणार्‍या मुख्य सूत्रधाराचाही शोध चालू आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी गुन्हे नोंदवण्यासमवेत संबंधितांवर कठोर कारवाई कधी करणार ? तेही सांगावे !