मेळघाटात वन्य प्राण्यांना विषाद्वारे मारण्याचा प्रकार !

अमरावती – मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत धारणी तालुक्यातील चौराकुंड वनपरिक्षेत्रात अरण्यातील नैसर्गिक पाणवठ्यात युरिया (विष) कालवून ४ रानगवे, २ भेकड आणि मोर यांच्यासह अनेक निष्पाप पक्ष्यांना ठार मारण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने कारवाई करत गावातील मुख्य आरोपीला अटक केली, तर अन्य ६ जण पसार आहेत. याचाच राग मनात धरून ३० मेच्या रात्री अटक केलेल्या आरोपीचे नातेवाईक आणि काही ग्रामस्थ यांनी चौकशी करणारे वनविभागाचे अधिकारी अन् कर्मचारी यांच्यावर दगडफेक केली. यात एक महिला आणि एक पुरुष असे २ वनरक्षक गंभीर घायाळ झाले. २२ मे या दिवशी प्राण्यांना विषबाधा करून मारल्याचे उघडकीस आले होते.
🚨 Melghat: Wild animals killed through poisoning!
After the accused were arrested, two forest guards were injured in stone-pelting.
This reflects a disturbing disregard for the law and for those protecting our forests.
Strict action is needed to ensure such crimes are not… pic.twitter.com/HbQCBsGUvC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 2, 2026
धारणीचे पोलीस निरीक्षक अवतारसिंह चौहान म्हणाले की, वन कर्मचार्यांवर दगडफेक करण्यासाठी जाणीवपूर्वक अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दगडफेक करणार्या एका युवकाला अटक केली. सद्यःस्थितीत गावात धारणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून घायाळ वनरक्षकांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा