
लोणी काळभोर, (जिल्हा पुणे) – केंद्र सरकारच्या वर्ष २०२७ च्या जनगणनेच्या कामासाठी नियुक्ती करूनही कामावर उपस्थित न राहून प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील ५ शिक्षकांवर जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तहसील प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही या शिक्षकांनी कामास नकार दिल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारी अन्वये तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी शिक्षकांना कामावर हजर रहाण्याचे आदेश देऊनही या शिक्षकांनी कामावर येण्यास टाळाटाळ करून जनगणनेच्या कामाला येण्यास नकार दिला. त्यामुळे प्रशासनाने पोलीस कारवाईचा मार्ग अवलंबला आहे. (अशी वेळ येणे हे दुर्दैवी आहे ! – संपादक) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करत आहेत.
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ