४ सदस्यांची चौकशी समिती स्थापन !

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या लहान मुलीच्या मृत्यूचे प्रकरण

पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान प्रियांशी बागडे या ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ४ सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली असून यामध्ये २ बालरोगतज्ञ, १ भूलतज्ञ यांचा समावेश आहे. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता सांगडे, डॉ. किरण म्हंकाले आणि डॉ. आरती कदम यांचा समावेश आहे. या समितीने ७ दिवसात प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश महापालिकेचे साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिला.