
पंढरपूर – येथे अधिक मासानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असल्याने भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन मिळावे यासाठी ‘विशेष दर्शन सुविधा’ (व्ही.आय.पी.) पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दर्शन रांगांमध्ये शेडनेट आणि पावसापासून संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली असून दर्शन रांगांमध्ये घुसखोरी करणार्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
अधिक मास कालावधीत दर्शन व्यवस्था दररोज सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत उपलब्ध असून दर्शन रांगेचे प्रवेशद्वार रात्री १० वाजता बंद करण्यात येत आहे. रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत श्रींची विश्रांती, तसेच पहाटे ४ ते ५ या वेळेत काकड आरती आणि नित्यपूजा होत असल्याने या कालावधीत दर्शन बंद रहाणार आहे. त्यामुळे भाविकांनी दर्शनाच्या वेळेची माहिती घेऊनच दर्शन रांगेत प्रवेश करावा, असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले आहे.
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक