आळंदी – येथील ‘संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरा’च्या रोख विभागातून विशाल वारूळे या स्वयंसेवकाने चोरी केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात उघड झाले आहे. मंदिर प्रशासनाने संशयित आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले असून मंदिराची सुरक्षा कडक करण्यासाठी २५ मे या दिवशी झालेल्या तातडीच्या बैठकीत कठोर निर्णय आणि नियमावली लागू केली आहे. या प्रकरणी ‘कॅश’ विभाग, प्रशासन आणि अन्नदान विभागाचे प्रमुख यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला.
१. रोकड विभाग पूर्णपणे बंदिस्त करून तेथे केवळ नियुक्त कर्मचार्यांनाच ‘आर्.एफ्.आय.डी.’ (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशान) द्वारे प्रवेश मिळेल. अन्नदान आणि रोख रक्कम मोजणीच्या ठिकाणी स्वयंसेवकांना प्रवेश बंदी असेल.
२. सर्व कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांना गणवेश अन् ओळखपत्र सक्तीचे असून येण्या-जाण्यासाठी केवळ ‘हनुमान दरवाजा’ वापरावा लागेल. मंदिरात पिशवी आणण्यास सक्त मनाई असेल.
३. दानपेट्या मुख्य व्यवस्थापक आणि ‘दान मोजणी गटा’च्या उपस्थितीतच उघडल्या जातील. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण जाईल आणि खोलीबाहेर पडतांना कर्मचार्यांची झडती घेतली जाईल.
४. मंदिरातील सीसीटीव्ही छायाचित्रक ‘एआय’ तंत्रज्ञानाशी जोडले जातील. मंदिर व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी प्रतिदिन किमान एक विश्वस्त मंदिराला भेट देईल.

दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली