सहस्रावधी बकरे कह्यात !

मुंबई – मुंबईसह उपनगरांमध्ये ईदनिमित्त मुंबई महानगरपालिकेकडून अनुमती न घेता बळी देण्यासाठी आणलेले सहस्रावधी बकरे पोलिसांनी कह्यात घेतले आहेत. मागील ३-४ दिवसांपासून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मीरा-भाईंदर परिसरातून मोठ्या प्रमाणात बकरे कह्यात घेण्यात आले.
इमारतीत बकरे कापायचे असल्यास त्यासाठी महानगरपालिकेची अनुमती अनिवार्य असते. त्यासाठी इमारतीच्या वतीने महानगरपालिकेकडे अर्ज करणे आवश्यक असते; परंतु मुंबईसह उपनगरांमध्ये अनुमती न घेताच मोठ्या प्रमाणात इमारतींमध्ये बकरे कापण्यासाठी आणण्यात आले होते.
इमारतीच्या मुसलमान अध्यक्षाने परस्पर अर्जाद्वारे घेतली ४० बकरे कापण्याची अनुमती !
घाटकोपर (पश्चिम) येथील ‘सागर पार्क हाऊसिंग सोसायटी’मध्ये बकरी ईदनिमित्त बळीसाठी १०० हून अधिक बकरे आणण्यात आले होते. येथे २० टक्के मुसलमान, तर ८० टक्के हिंदु रहिवासी आहेत. येथे मागील आठवड्यापासून ईदनिमित्त बळी देण्यासाठी १०० हून अधिक बकरे आणण्यात आले होते. याविषयी इमारतीतील सदस्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीनंतर पोलीस येण्यापूर्वी मुसलमानांनी काही बकरे दुसरीकडे हलवले. पोलिसांनी अन्वेषण केले असता या सोसायटीकडून मुंबई महानगरपालिकेकडे ४० बकरे कापण्यासाठी अर्ज केल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात मात्र इमारतीच्या समितीमधील हिंदु सदस्यांना विश्वासात न घेता मुसलमान असलेल्या अध्यक्ष व्यक्तीने इमारतीच्या ‘लेटरहेड’चा उपयोग करून परस्पर अर्ज केल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी इमारतीत आणलेले सर्व बकरे कह्यात घेतले आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !