आरोपींना जामीन मिळाल्यानिमित्त ‘मेजवानी’ !

कल्याणीनगर ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरण !

पुणे – कल्याणीनगर परिसरात २ वर्षांपूर्वी ‘पोर्शे कार’ अपघातात तरुण आणि तरुणी यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणात अटक झालेल्या अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन संमत केला होता. महिन्यापूर्वी जामीन मिळाल्यानंतर अगरवाल कुटुंबाने मोठी मेजवानी करत गळ्यात नोटांचा हार घालून नाचगाणे केल्याची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. त्यातून अगरवाल कुटुंबाचा उद्दामपणा दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या चित्रफितीमध्ये मुख्य आरोपी विशाल अगरवाल आणि पत्नी गळ्यात नोटांचे हार घालून नाचत आहेत. सामाजिक माध्यमांवर प्रसारित होणारी चित्रफीत नेमकी कधीची आहे? ती जामीनानंतरची आहे का? याविषयी अधिकृत पुष्टी झालेली नाही.

संपादकीय भूमिका

चित्रफितीतून अगरवाल कुटुंबाचा उद्दामपणा उघडकीस !