सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांचे मत

पुणे – ‘महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे कर्तृत्व, धर्मवीर संभाजी महाराज यांचे बलीदान आणि स्वराज्य स्थापनेत योगदान दिलेल्या असंख्य मावळ्यांच्या त्यागाचे प्रतीक म्हणून तो भारताच्या स्वाभिमानाचा विषय आहे. मराठा साम्राज्य ही देशाच्या इतिहासातील प्रेरणादायी गोष्ट आहे. त्यामुळे मराठा साम्राज्याचा ‘अटक ते कटक’ हा ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पुस्तकातून हटवलेला नकाशा पुन्हा समाविष्ट झालाच पाहिजे,’ अशी ठाम भूमिका सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी मांडली.
एन्.सी.ई.आर्.टी.ने ‘अटक ते कटक’ हा मराठी साम्राज्य दर्शविणारा नकाशा हिंदी आणि इंग्रजी पाठ्यक्रम पुस्तकातून काढून टाकला आहे. त्याच्या निषेधार्थ शिवप्रेमींनी पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा ‘महाराष्ट्र धर्म मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये इतिहास संशोधक, अभ्यासक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.
छत्रपती वृषाली राजे भोसले पुढे म्हणाल्या की, एन्.सी.ई.आर्.टी.ने पाठ्यक्रम पुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा काढून दैदीप्यमान इतिहास लपवण्याचा आणि खोटा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. छत्रपती घराण्यांसह संपूर्ण महाराष्ट्राकडून त्याचा निषेध व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सरकारने याविषयी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन करत ‘जोपर्यंत हा नकाशा पाठ्यक्रम पुस्तकामध्ये पुन्हा प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहील,’ असेही त्या म्हणाल्या.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
देहू (पुणे) ते पंढरपूर ‘सायकल वारी’ची दशकपूर्ती !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज