
ठाणे – राज्यात गोवंशाची अवैध वाहतूक आणि कत्तलीच्या वाढत्या घटनांवर कठोर कारवाई करण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या नव्या शासन परिपत्रकाची तातडीने आणि काटेकोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने स्वदेशी गायीला ‘राज्यमाता’ दर्जा देत गोवंश संरक्षणाला विशेष महत्त्व दिले आहे, तसेच गोवंश हत्या बंदी आणि अवैध वाहतूक यांच्यावर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत; मात्र काही तस्कर आणि समाजकंटक अजूनही छुप्या मार्गाने गोवंशियांची वाहतूक आणि कत्तल करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे प्राणी कल्याण कायद्यांचे उल्लंघन होत असून धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे विहिंपने निवेदनात म्हटले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !