श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमीपूजन
मुंबई – श्री सिद्धिविनायक मंदिरात येणार्या भाविकांना सुलभ आणि अल्प वेळेत सिद्धिविनायकाचे दर्शन झाले पाहिजे. मंदिर परिसरात पायाभूत सुविधांची कामे करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून मंदिर परिसराचे सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवे रूप मिळणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ‘श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यासा’चे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) सदानंद सरवणकर, महापौर सौ. रितू तावडे, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्यासह न्यासाचे विश्वस्त उपस्थित होते.

गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !