नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण

लातूर – वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट-यूजी’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या वादामुळे रहित झाल्याने निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील विद्यार्थिनी कु. मैथिली अशोक सोनवणे (वय १८ वर्षे) हिने रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिचे आधुनिक वैद्य होण्याचे स्वप्न होते. मुलांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहन तज्ञांनी केले आहे.
३ मे या दिवशी झालेली परीक्षा उत्तम गेल्यानंतर सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असा मैथिलीला विश्वास होता; मात्र परीक्षा रहित होऊन २१ जून या दिवशी होणार्या फेरपरीक्षेचा मानसिक दबाव आणि वाढता तणाव सहन न झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. गातेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात् मृत्यूची नोंद केली आहे.
देशभरात १२ दिवसांत ६ विद्यार्थ्यांचा अंत !
नीट परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे आणि वर्षभराचे कष्ट पाण्यात गेल्याच्या नैराश्येतून १३ ते २५ मेच्या कालावधीत देशात ६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.
देशात राजस्थानचा प्रदीप मेघवाल (वय २२ वर्षे, सीकर), उत्तरप्रदेशचा रितिक मिश्रा (वय २१ वर्षे, लखीमपूर खेरी), देहलीची कु. अंशिका पांडे (वय २० वर्षे, आझादपूर), गोवा (मडगाव) आणि कर्नाटकातील प्रत्येकी एका १७ वर्षीय परीक्षार्थीने मानसिक दबावापोटी आत्महत्या केली आहे.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’