स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपकीर्तीचे प्रकरण !

पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अपकीर्ती प्रकरणात आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सादर न केल्याने एका समाज माध्यम अन् सर्च इंजिन (शोध संकेतस्थळ), तसेच एका नामांकित वृत्तपत्राविरोधात अटक वॉरंट काढण्यात यावे, असा अर्ज सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात केला. या खटल्यात न्यायालयाने यापूर्वी दंड प्रक्रिया संहिता कलम ९१ अंतर्गत संबंधित समाजमाध्यम, सर्च इंजिन आणि वृत्तपत्र यांना आवश्यक ती कागदपत्रे अन् माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यांचे अधिवक्ता न्यायालयात उपस्थित राहिले असले, तरी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्याचे अर्जात म्हटले आहे.
तक्रारदार पक्षाने यापूर्वीही संबंधितांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज प्रविष्ट केला होता, जो अद्याप प्रलंबित आहे. आता या संदर्भात नव्याने अर्ज प्रविष्ट करण्यात आला आहे. या अर्जावर १ जून या दिवशी आदेश दिला जाईल, तसेच याच दिवशी बचाव पक्षाकडून पुढील उलटतपासणी केली जाईल.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमधील अनिवासी भारतियांसमोर भाषण करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक विधान केले होते. या विधानामुळे सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट केला आहे. पुणे येथील एम्.पी.एम्.एल्.ए. विशेष न्यायालयात (आमदार आणि खासदार यांच्याशी संबंधित प्रलंबित खटल्यांची जलदगतीने सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयात) या खटल्याची सुनावणी चालू आहे.
वीर सावरकर उवाच
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !