ठाणे येथे ‘लोक हिंद गौरव पुरस्कार सोहळ्या’त कर्तृत्ववानांचा सन्मान ! 

‘लोक हिंद पुरस्कार’ देऊन कर्तृत्ववानांचा केलेला सन्मान 

लोक हिंद पुरस्कार’ देऊन कर्तृत्ववानांचा केलेला सन्मान

ठाणे, २५ मे (वार्ता.) – समाजकारण, पत्रकारिता, शिक्षण, कला, सामाजिक कार्य आणि ग्रामीण भागांत उल्लेखनीय काम करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींना एकाच व्यासपिठावर गौरवणारा ‘लोक हिंद गौरव राज्य पुरस्कार सोहळा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ, लोक हिंद चॅनल, जनक्रांती संघटना, साप्ताहिक शिवमार्ग आणि डी.वाय. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ज्ञानराज सभागृह येथे आयोजित सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर आणि गायक महेश कंटे यांची विशेष उपस्थिती लाभली.

१. किशोर ठाकरे, अजित मराठे, धीरज सांबरे, स्वप्नजा जाधव, किसनराव तारमळे, प्रकाश कंटे, भानुदास भोईर, सुरेश बांगर, तुकाराम बांगर, परशुराम पितांबरे, अशोक घोलप, प्रथमेश आकरे, पी.एन्. पाटील, एन्.ए. कदम, दशरथ हरड, विजय जाधव, गजानन व्यापारी, खंडूशेठ चौधरी, गुरुनाथ निपुर्ते, लहुजी देसले, जैतू दादा भोईर आणि सागर राजपूत यांच्यासह ५० मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, सुवर्णपदक, ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

२. ‘लोक हिंद चॅनल’चे किसन बोंद्रे यांच्या आवाहनानंतर कल्याण-मुरबाड रस्त्यावरील अपघातात मृत्यू झालेल्या ३ भावंडांच्या एकमेव बहिणीसाठी १ लाख रुपयांचे साहाय्य या वेळी करण्यात आले.

३. ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर म्हणाले, ‘‘हा पुरस्कार सोहळा ग्रामीण संस्कृतीचा जिवंत ओलावा जपणारा असून माणुसकीची खरी ओळख करून देणारा आहे.’’

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश धानके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लक्ष्मण घरत, संतोष ठाकरे, नवज्योत पिंगळे आणि मकरंद बात्रे यांनी परिश्रम घेतले.