
सोलापूर – शहरातील ऐतिहासिक सिद्धेश्वर तलाव परिसरात दूषित पाणी आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे माशांचे हाल होत आहेत. तलावातील अनेक मासे पाण्याच्या पृष्ठभागावर आणि काठाजवळ येत असून काही मासे मृत अवस्थेत आढळले आहेत. मृत माशांना खाण्यासाठी कावळ्यांची गर्दी होत असल्याने तलाव परिसरात दुर्गंधी पसरत आहे. सकाळपासून फिरण्यासाठी येणार्या नागरिकांनी याविषयी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. तलावातील पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ‘तलावातील माशांना प्राणवायू मिळत नाही, पाणी दूषित झाले आहे. अशा परिस्थितीत पालिका प्रशासन तातडीने उपाययोजना करणार का ?’, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दूषित पाण्याचा स्रोत शोधून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नाही का ? – संपादक)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !
माहिती अधिकाराच्या नव्या नियमांच्या विरोधात आवाज उठवावा ! – अधिवक्ता तुषार झेंडे, जिल्हा ग्राहक परिषद
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
‘नीट’च्या फेरपरीक्षेला विलंबाने पोचलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला !