‘कॉकरोच जनता पार्टी’ मोहिमेच्या विरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे विधान

नवी देहली – सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून सामाजिक माध्यमांवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ स्थापन करून न्यायालयाची नाहक अपकीर्ती केली जात असल्याचा दावा करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. न्यायालयाने मात्र या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. ‘या विषयाकडे इतके भावूक होऊन पाहू नका’, असा सल्ला सरन्यायाधिशांनी अधिवक्त्यांना दिला.
१५ मे या दिवशी एका सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायालयीन यंत्रणेवर चिखलफेक करणार्या प्रवृत्तींवर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. ते म्हणाले होते की, समाजात असे काही परजीवी आहेत, जे सातत्याने व्यवस्थेवर आक्रमणे करत असतात. तुम्हाला त्यांच्याच पंगतीला जाऊन बसायचे आहे का ? काही तरुण हे ‘कॉकरोच’सारखे (झुरळासारखे) असतात, ज्यांना कायद्याच्या क्षेत्रात किंवा इतर कुठेही काम मिळत नाही; मग असे लोक पत्रकारिता, सामाजिक माध्यम किंवा माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात आणि सर्वांवरच चिखलफेक करू लागतात.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’