मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या आदेशानंतर अवघ्या ३ दिवसांत व्यापक कारवाई
१ कोटी ४३ लाख रुपयांचे अमली पदार्थही केले जप्त !

चेन्नई (तमिळनाडू) – अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी कारवाईचे आदेश दिले. यानंतर तमिळनाडू पोलिसांनी अवघ्या ३ दिवसांत ३ सहस्र २४६ गुन्हेगार, तसेच ४१९ अमली पदार्थ तस्कर यांना अटक केली. या मोहिमेत १५ सहस्र ३४९ लोकांची तपासणी करण्यात आली. यात १२ सहस्र ६५० अट्टल गुन्हेगारांचा समावेश होता. यांपैकी ३ सहस्र २४६ लोकांना पुढील चौकशीसाठी अटक करण्यात आली.
अमली पदार्थ कायद्यांतर्गत अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत पोलिसांनी २९४ गुन्हे नोंदवले. २६८ किलोग्राम गांजा आणि २ सहस्र ४७६ अमली गोळ्या जप्त केल्या. त्याचे अनुमानित मूल्य १ कोटी ४३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४८ घंट्याच्या आत जोसेफ विजय यांनी मोठे निर्णय घेतले. यातच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अनुमाने ६५ अमली पदार्थविरोधी कृती दलांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
बनावट चलनाद्वारे सातारा जिल्हा परिषदेची २८ लाख ५० सहस्र रुपयांची फसवणूक !