शुभेंदु अधिकारी शासनाचा निर्णय
आतापर्यंत २ दिवसांची सुटी देत असे पूर्वीचे तृणमूल काँग्रेसचे सरकार !

कोलकाता (बंगाल) – मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील बंगाल शासनाने आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत बकरी ईदच्या सुटीमध्ये कपात केली आहे. आता या सणाला केवळ १ दिवसच म्हणजे २८ मे या दिवशी सुटी असेल. तृणमूल काँग्रेस सरकार या सणाला २ दिवसांची सुटी देत असे.
Bengal Finally Ends 2-Day Bakri Eid Appeasement
Only a one-day holiday for Bakri Eid in Bengal this year. A major decision by Suvendu Adhikari.
Until now, the previous Mamata Banerjee-led Trinamool Congress government used to grant a 2-day holiday.
Such decisions by Bengal’s… pic.twitter.com/IWWKbj1sr2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 24, 2026
कायद्याने प्रतिबंधित प्राण्यांचा बळी देण्यापासून पूर्णपणे दूर रहावे ! – जमियत उलेमा-ए-हिंदचे बंगालच्या मुसलमानांना आवाहन
जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी बकरी ईदच्या संदर्भात चालू असलेल्या वादावर मुसलमानांना आवाहन केले आहे. ते म्हणाले की, बळीची प्रथा इस्लामची एक महत्त्वाची आराधना आहे. प्रत्येक मुसलमानाने बळी अर्पण करण्याचा प्रयत्न करावा. तथापि सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे आणि स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करावे. कायद्याने प्रतिबंधित प्राण्यांचा बळी देण्यापासून पूर्णपणे दूर रहावे.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत