
१. विविध संप्रदायांतील भाविक, तसेच विदेशी नागरिकही या यज्ञसोहळ्यासाठी आले होते.
२. अनेक भाविक सहकुटुंब आले होते आणि त्यांची लहान मुले पूर्ण यज्ञविधीत अनुमाने ४ घंटे शांतपणे बसून होती.
३. मुंबईच्या लोकलगाड्यांमध्ये ‘स्क्रीन टीव्ही’वर प्रसारित होणारे विज्ञापन आणि शहरात लावलेले फलक पाहून अनेक जण उत्स्फूर्तपणे यज्ञाला आले होते.
४. ठिकठिकाणांहून तरुणांचे गट यज्ञविधी अनुभवण्यासाठी आले होते.
५. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आलेले अनेक भाविक बाहेर ऐकू येणारे मंत्रोच्चार ऐकून यज्ञस्थळी आले.
विशेष !
१. अनेक जण सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रवेशद्वारावरील छायाचित्राचे भावपूर्ण दर्शन घेऊन आत जात होते.
२. अनेक भाविक पटांगणात लावलेल्या ‘स्क्रीन’वर चालू असलेल्या यज्ञविधीच्या कार्यक्रमाचे छायाचित्र त्यांच्या भ्रमणभाषमध्ये घेत होते.
३. यज्ञस्थळाचे वातावरण अत्यंत उत्साही आणि आनंदी होते.
४. प्रदर्शनकक्षातील आयुर्वेदीय झाडांची लागवड करण्याच्या संदर्भातील ग्रंथ आणि झाडे पाहिल्यावर ‘ती आपण घरी लावू शकतो’, असा आत्मविश्वास निर्माण झाल्याचे भाविकांनी सांगितले.
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !