दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेतील करार
(‘डेटा सेंटर हब’ म्हणजे संगणकीय सेवांचे मुख्य केंद्र)

मुंबई – स्वित्झर्लंडच्या दावोस येथील ‘जागतिक आर्थिक परिषदे’त झालेल्या कराराच्या अनुषंगाने राज्यातील औद्योगिक, पायाभूत सुविधा, शैक्षणिक, डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि शाश्वत विकास यांच्याशी संबंधित प्रकल्पांना गती देण्यासाठी भूमी वाटप, अनुमती आणि प्रशासकीय प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावी. राज्यातील सामंजस्य कराराच्या अनुषंगाने प्रकल्पांच्या कार्यवाहीवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग संचालनालय आणि मंत्रालय येथील १० प्रमुख अधिकार्यांना ‘प्रत्येकी १० प्रकल्प वेळेत पूर्ण होतील’, याचे दायित्व देण्यात येणार आहे. येत्या काळात महाराष्ट्र ‘डेटा सेंटर हब’ होणार आहे, असेे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी दावोस येथे झालेल्या ‘जागतिक आर्थिक परिषदे’तील सामंजस्य करारांच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्र डेटा सेंटर हब बनण्याच्या दिशेने अग्रेसर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीसंदर्भात व राज्यातील डेटा सेंटर्सच्या सद्यःस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली.
स्वित्झर्लंडच्या दावोस येथील… pic.twitter.com/dif8N3DOmC
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 22, 2026
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘नवी मुंबई हे राज्यातील प्रमुख डेटा सेंटर हब म्हणून उदयास येत आहे. महापे आणि परिसरात मोठे प्रकल्प चालू होत आहेत. खालापूरला तिसरे महत्त्वाचे डेटा सेंटर ‘क्लस्टर’ म्हणून विकसित करण्याचे नियोजन चालू आहे. पनवेल परिसरात पायाभूत सुविधा भक्कम करण्यावर भर देण्यात येत आहे.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !