
मुंबई – पितांबरी उद्योगसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई लिखित ‘आधुनिक शेतीचे मॉडेल’ आणि ‘आपलं कोकण-अणुस्कुरा ते साखळोली स्वप्नपूर्तीचा अद्भुत प्रवास’ या पुस्तकांचे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. २० मे या दिवशी राजभवन येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रगतीशील शेतीच्या नवनवीन प्रयोगांचा समावेश असलेली ही पुस्तके आधुनिक शेती करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देणारी आहेत. या सोहळ्याला श्री. मधुकर पुजारी, सौ. प्रिया प्रभुदेसाई, शैलेजा शेट्टी आणि प्रियांका पावसकर हे पितांबरी उद्योगसमूहाचे पदाधिकारी, तसेच पद्मश्री पुरस्कारप्राप्त रमेश पतंगे, ‘विवेक प्रकाशना’चे आदिनाथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शेती लागवडीमध्ये केलेल्या नवनवीन प्रयोगांचा स्वानुभव डॉ. प्रभुदेसाई यांनी या पुस्तकांमध्ये शब्दांकित केला आहे. बांबू, सोनचाफा, आयुर्वेदीय वनस्पती, विविध फळझाडे, भाजीपाला आणि ऊसाची लागवड यांतील प्रयोगांचा या पुस्तकांमध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतांना ज्यांमध्ये अपयश आले, ते प्रयोगही त्यांनी या पुस्तकांमध्ये लिहिले आहेत. त्यामुळे ‘शेती करतांना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात’, हेसुद्धा या पुस्तकांतून समजणार आहे. डॉ. प्रभुदेसाई यांनी स्वत:चे अनुभव लिहिलेले असल्यामुळे पुस्तकातील माहिती अधिक वस्तूनिष्ठ आहे.
Books on agriculture authored by Dr. Ravindra Prabhudesai, Managing Director of the ‘Pitambari’ Group, were officially released by Maharashtra Governor @Jishnu_Devvarma at Lok Bhavan, Mumbai! 🇮🇳
“Guidebooks for the new generation!” – Governor
“These books will inspire farmers!”… pic.twitter.com/Z3t0FREgQJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2026
नव्या पिढीसाठी मार्गदर्शक पुस्तके ! – राज्यपाल
नव्या पिढीतील आधुनिक शेतकरी आणि कृषी क्षेत्रात येऊ इच्छिणारे तरुण यांसाठी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांनी लिहिलेली दोन्ही पुस्तके अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतील !
Padmashri Ramesh Patange, Patron of Saptahik Vivek, Padmashri Dada Idate, Dr. Ravindra Prabhudesai, along with members of the Samarasata Manch, Vivek Parivar, the Pitambari family were present. pic.twitter.com/OKtJbgt14T
— Governor of Maharashtra (@maha_governor) May 20, 2026
ही पुस्तके शेतकर्यांना प्रेरणा देतील ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई
राज्यपालांच्या हस्ते माझ्या पुस्तकांचे प्रकाशन होणे, हा माझ्यासाठी अत्यंत सन्मानाचा क्षण होता. कोकणातील कृषी विकास आणि आधुनिक शेती पद्धतींविषयीच्या अनेक वर्षांचे समर्पित कार्य, अनुभव अन् दूरदृष्टी यांचा परिपाक या पुस्तकांमध्ये आहे. पुस्तकांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना प्रेरणा देणारे आणि त्यांना सक्षम करणारे व्यावहारिक अनुभव, तसेच प्रगत शेतीचे मॉडेल (नमुना) मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले