महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र होणार ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

२९ आणि ३० मे या दिवशी ‘मुंबई टेक वीक’चे आयोजन

मुंबई – कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ‘एआय’ स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ‘मुंबई टेक वीक’सारख्या उपक्रमांमुळे एआयमधील संधी युवकांपर्यंत पोचतील आणि महाराष्ट्र देशातील एआय नवोन्मेषाचे (नवनिर्मितीचे) अग्रगण्य केंद्र होईल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांनी ‘मुंबई टेक वीक’ २०२६ ची घोषणा सह्याद्री अतिथीगृहात केली, त्या वेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम २९ आणि ३० मे या दिवशी ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे होणार आहे. यात विविध क्षेत्रांतील एआयच्या प्रत्यक्ष वापराचे सादरीकरण होणार आहे.