नसरापूर येथील बालिका अत्याचार प्रकरण
पोलीस बंदोबस्तामध्ये आरोपी न्यायालयात उपस्थित होणार

पुणे – नसरापूर (ता. भोर) येथील ४ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील खटल्याची विशेष न्यायालयात पहिल्या दिवसाची सुनावणी झाली. आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात २८ मे या दिवशी दोषारोप निश्चिती होणार आहे. यापूर्वी आरोपीची ओळख, वैद्यकीय पडताळणी आणि पुढील सुनावणीसाठी आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले. विशेष न्यायाधीश एस्.आर्. साळुंखे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.
१. विशेष सरकारी अधिवक्ता अजय मिसर यांनी आरोपीची ओळख निश्चिती आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे कि नाही यासाठी वैद्यकीय पडताळणीचा अर्ज केला होता. तो न्यायालयाने मान्य केला.
२. आरोपीला दोषारोपपत्राची प्रत मिळाल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाने आरोपीसाठी ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा’ला अधिवक्त्याची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.
३. आरोपी आणि त्यांच्या अधिवक्त्यांमध्ये थेट संवाद होण्यासाठी सरकार आणि बचाव पक्ष यांनी त्याला प्रत्यक्ष उपस्थित करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ही विनंती मान्य केली.
४. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याने २१ मे या दिवशीची सुनावणी ‘दृकश्राव्य प्रणाली’द्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) झाली.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’