
पुणे – ‘समस्त महाजन’ आणि ‘जैन इंटरनॅशनल फिलॉसॉफिकल रिसर्च ऑर्गनायझेशन’ (जिप्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आत्मकल्याण आणि प्रेरणादायी चर्चासत्रांच्या मालिकेत ‘सुखी जीवन जिनेकी कला’ या विषयावर चर्चासत्र उत्साहात पार पडले. येथील मुकुंदनगर येथे १५ मे या दिवशी हा कार्यक्रम झाला. ‘समस्त महाजन’चे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. गिरीशभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थेचे महाराष्ट्र समन्वयक रमेशभाई ओसवाल, ‘सुजय गार्डन जैन संघा’चे अध्यक्ष राजेंद्रभाई शाह आणि राजेशभाई शाह, प्रमुख वक्ते सीए जयेशभाई शेठ, अधिवक्ता एस्.के. जैन, डॉ. कल्याणजी गंगवाल, शैलेशभाई शाह यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. रमेशभाई ओसवाल हे महाराष्ट्राचे समन्वयक असून १ सहस्र ८६ गोशाळांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असतात. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
सनदी लेखापाल (सीए) जयेशभाई शेठ यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, आत्म्याला अनंत दुःखांपासून वाचवण्यासाठी आणि अनंत सुख प्राप्त करण्यासाठी साधकाने आत्म जागृतीत रहाणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाला बिरेनभाई शाह, दिलीपभाई शाह, सनदी लेखापाल हरेशभाई शाह यांच्यासह हिंदु जनजागृती समिती आणि श्री जैन युवक महासंघ, जैन सोशल ग्रुप, श्री गोटीवाला ओसवाल जैन संघ, दी पूना मर्चंट चेंबर या संघटनांचे विशेष सहकार्य लाभले. रमेशभाई ओसवाल यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेशभाई शाह यांनी आभार मानले.
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !