देवस्थान इनाम निर्मूलन कायदा तात्काळ रहित करा ! – छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे निवेदन

छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

निवेदन स्वीकारतांना अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’च्या विरोधात महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांना देण्यात आले.

या वेळी मंदिर महासंघासह ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, छत्रपती शिवराय प्रतिष्ठान, श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, श्री भद्रा मारुति संस्थान, श्री दशमेश नगर विकास संस्था दशमेशनगर, श्री संत काशी विश्वनाथ बाबा संस्थान बीड बायपास यांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

निवेदन स्वीकारतांना जालना येथील जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल

जालना येथील जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांना निवेदन दिले. या वेळी मंदिर महासंघ, श्री बालाजी मंदिर देवस्थान, श्री नर नारायण मंदिर, श्री अमृतेश्वर महादेव मंदिर आणि श्री राम मंदिर यांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.