सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील प्रकार

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील वर्ष २०१९-२० पासून २०२५-२६ पर्यंत विविध अभ्यासक्रमांसाठी देण्यात येत असलेल्या विविध शिष्यवृत्त्यांचे १२ सहस्रांहून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. यात पहिल्या आणि दुसर्या हप्त्याची शिष्यवृत्ती थकित आहे. यात २०२५-२६ या वर्षातील ७ सहस्र ५०० हून अधिक अर्ज प्रलंबित आहेत. (एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्ज प्रलंबित रहातातच कसे ? – संपादक)
१. ‘महाडीबीटी पोर्टल’वरील शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या ‘ऑनलाईन अर्जा’वर प्रतिदिन कार्यवाही करणे आवश्यक आहे.
२. कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, संस्था स्तरावर विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज प्रलंबित रहाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
३. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जाच्या प्रती महाविद्यालयात जमा केल्या नाहीत, असे कारण देऊ नये. त्यामुळे ऑनलाईन अर्ज प्रलंबित ठेवले असतील, तर तसे कोणत्याही संस्थेने करू नये.
४. ‘शैक्षणिक संस्थांनी अर्जाच्या पडताळणीसाठी कार्यशाळा आयोजित करून एकही अर्ज प्रलंबित रहाणार नाही, याची दक्षता घ्यावी’, असे विद्यापिठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !