आर्थिक गुन्हे विभागाकडून माजी संचालकाला अटक

पणजी, २० मे (वार्ता.) – बार्देश तालुक्यातील पीर्ण येथील ‘अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-आपॅरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’ या पतसंस्थेत ११ कोटी २८ लाख ९३ सहस्र २१३ रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणी पतसंस्थेचे माजी संचालक प्रकाश कांदोळकर (वय ७० वर्षे) यांना १९ मे या दिवशी त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना न्यायालयासमोर नेण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकाश कांदोळकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता; परंतु गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. अष्टगंधा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये हा घोटाळा झाल्याविषयीची तक्रार पतसंस्थेच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष मंगेश फडते यांनी प्रविष्ट (दाखल) केली होती. या तक्रारीत १४ जुलै २०२३ पूर्वी अस्तित्वात असलेल्या माजी संचालक मंडळाने आणि मुख्य कार्यकारी अधिकार्याने बनावट कागदपत्रे सिद्ध करून कर्जाचे वाटप केल्याचे दाखवले होते. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला आहे.
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री