
पुणे – सराईत गुंड वनराज आंदेकर याच्या खुनातील आरोपीचा भाऊ अक्षय बापू म्हस्के याच्यावर गोळीबार करण्यात आला. अक्षयला खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. तेव्हा त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी आकाश म्हस्के याचा भाऊ आहे. ही घटना २० मे या दिवशी सकाळी बालाजीनगर परिसरात घडली. वनराज आंदेकर याची सप्टेंबर २०२४ मध्ये पुण्यातील गणेश पेठ परिसरात हत्या करण्यात आली. यानंतर टोळी युद्ध पुन्हा चालू झाले. गेल्या वर्षभरात टोळी युद्धातून हत्येची ही तिसरी घटना आहे. आतापर्यंत आयुष कोमकर, गणेश कराळे आणि आता अक्षय म्हस्के यांची हत्या करण्यात आली. (विद्येचे माहेरघर असलेले पुणे गुन्हेगारांचे आश्रयस्थान नाही ना ? – संपादक)
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
आरोपीवर दोषारोप निश्चित !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !