१ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्‍या २ अधिकार्‍यांना अटक

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील घटना

नवी मुंबई – नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील २ अधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी १ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक केली.

उपसचिव डॉ. दीपक आवटे आणि स्वच्छता अधिकारी समीर म्हात्रे अशी त्यांची नावे आहेत. बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छतेचे काम करणार्‍या एका ठेकेदाराने या प्रकरणी तक्रार केली होती. ठेकेदाराच्या कामाच्या १ वर्षाच्या देयकाची रक्कम ९ लाख ७८ सहस्र रुपये इतकी आहे. या रकमेवर १५ टक्क्यांप्रमाणे १ लाख ४६ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी आरोपींनी केली होती. त्यांपैकी तडजोडीअंती १ लाख ४० सहस्र रुपये देतांना आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका

लाच घेणार्‍या कर्तव्यचुकार अधिकार्‍यांना बडतर्फ करून, त्यांना आजन्म कारागृहात डांबून, तसेच त्यांच्याकडून ही रक्कम सव्याज वसूल करून घ्यायला हवी ! तसे केल्यासच अशा प्रकारांना आळा बसेल !