महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांची मागणी
नीट प्रश्नपत्रिका फुटल्याचे पडसाद

पुणे – ‘राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षे’ची (‘नीट’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी पुण्यातील ‘मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया’तील शिक्षिका मनीषा मांढरे यांना अटक झाली. संबंधित शैक्षणिक संस्थेची मान्यता रहित करावी, संस्थाचालकांसह प्राचार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘महाविकास आघाडी’तील राष्ट्रीय काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गटाचे नगरसेवक यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाद्वारे केली.
१. महापालिकेची सर्वसाधारण सभा चालू होताच राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम आणि शरद पवार गटाचे काका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी सभागृहात आंदोलन चालू केले.
२. ‘हा विषय केंद्र सरकारशी संबंधित आहे. ‘केंद्रीय गुप्तचर विभागा’कडून त्याचे अन्वेषण चालू आहे. नगरसेवकांनी आंदोलन करू नये’, अशी विनंती महापालिकेतील भाजपचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केली. त्याकडे दुर्लक्ष करून विरोधकांनी सभागृहात जोरदार आंदोलन केले.
३. ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकरण आणि त्यानंतर ४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ सर्वसाधारण सभा तहकूब करावी, असा प्रस्ताव विरोधकांनी केला. या प्रस्तावाला गणेश बीडकर यांनी विरोध करून मतदानाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली.
४. ‘मॉडर्न महाविद्यालया’च्या प्राचार्या डॉ. निवेदिता गजानन एकबोटे या पुणे महानगरपालिका प्रभाग क्र. ‘१२ ड’ मधून भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांच्या नगरसेवक पदाच्या त्यागपत्राची मागणी विरोधकांनी केली.
प्राध्यापिका मनीषा मांढरे निलंबित !‘नीट २०२६’ची प्रश्नपत्रिका फोडल्याच्या प्रकरणात ‘मॉडर्न महाविद्यालया’च्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आली. ‘प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी’ने १८ मे या दिवशी घेतलेल्या आपत्कालीन बैठकीमध्ये मनीषा मांढरे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. गेल्या २४ वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असणार्या आणि सध्या ‘मॉडर्न महाविद्यालया’त जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या. |
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !