सनातनच्या १० वीच्या विद्यार्थ्यांचे सुयश
सनातनची साधिका कु. प्रांजली पवार हिचे इयत्ता १० वीच्या परीक्षेत सुयश !

पुणे, १५ मे (वार्ता.) – येथील सनातनचा साधक कु. हर्ष सुनील पाटील याला आय.सी.एस्.इ. बोर्डाच्या १० वीच्या परीक्षेत ९८.२ टक्के गुण मिळाले आहेत. तो हडपसर (पुणे) येथील ‘पवार पब्लिक स्कूल’मध्ये शिकत होता. हर्ष दैनिक वितरण करणे, जिज्ञासूंना सात्विक उत्पादने देणे तसेच आई सोबत संपर्कांना जातो. त्याला वाढदिवसानिमित्त मिळालेले पैसे साठवून नियमित अर्पण देतो. तो नामजप आणि उपाय करतो. ‘हे यश मिळवणे गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळे शक्य झाले’, असे त्याने सांगितले.

आटपाडी (जिल्हा सांगली), १७ मे (वार्ता.) – येथील ‘डायनामिक इंग्लिश मीडियम स्कूल’ची विद्यार्थिनी कु. प्रांजली दत्तात्रय पवार हिने इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९१.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात चौथा क्रमांक पटकावला आहे. या यशाविषयी सांगतांना कु. प्रांजली म्हणाली की, मी अभ्यासाच्या काळात सेवेला वेळ दिल्याने त्याचेच फळ भगवंताने मला या यशाच्या रूपाने दिले आहे. हे यश माझे नसून गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि भगवंत यांच्या कृपेमुळेच मिळाले आहे. कु. प्रांजली ही सनातन संस्थेचे साधक श्री. दत्तात्रय पवार आणि सौ. कविता पवार यांची कन्या आहे.
कु. प्रांजली हिने परीक्षेच्या कालावधीत श्रद्धेने आणि नियमितपणे प्रतिदिन १११ वेळा ‘गणपति स्तोत्र’ पठण केले. यासह प्रतिदिन प्रार्थना आणि श्री गणेशाचा नामजप भावपूर्ण करत होती. कु. प्रांजली परीक्षेच्या काळातही बालसंस्कारवर्गाच्या सेवेसाठी जात असे. तेथे फलक लेखन करणे, तसेच सनातनच्या सात्त्विक उत्पादने पोचवण्याची सेवा तिने केली.
‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !