४२ महिने वेतन न मिळाल्याने उचलले पाऊल !

पुणे – ४२ महिन्यांचे वेतन न मिळाल्याने कर्जबाजारी झालेल्या समीर दाभोळकर (वय ५३ वर्षे) या सुरक्षारक्षकाने सिंहगड शैक्षणिक संस्थेच्या आवारात आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या मुलाने तक्रार दिली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुति नवले, सचिव सुनंदा नवले, उपाध्यक्ष रचना नवले आणि रोहित नवले यांच्यासह विश्वस्तांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मागील ४२ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने समीर दाभोळकर मानसिक तणावाखाली होते. त्यांनी सिंहगड शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहात आत्महत्या केली. या घटनेचे पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !