अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी प्रविष्ट केली याचिका

नवी देहली – तमिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी अलीकडेच सनातन धर्माच्या निर्मूलनाच्या केलेल्या विधानाची नोंद घेणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी ही अवमान याचिका प्रविष्ट केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिसांनी स्टॅलिन यांच्यावर कारवाई केली नाही, असा दावा केला आहे. या प्रकरणावर १९ मे या दिवशी सुनावणी केली जाणार आहे.
Advocate @SachdevaAmita has filed a petition in the Supreme Court against Udhayanidhi Stalin over his repeated remarks insulting Sanatan Dharma.
The petition comes amid growing outrage across the nation against continuous attacks on Sanatan beliefs and traditions.
In September… https://t.co/IOL9Hbwl8w pic.twitter.com/LcpJ6E0bim
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 17, 2026
द्रमुकचे नेते उदयनिधी यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये ‘सनातन धर्मा’ची तुलना ‘मलेरिया’ आणि ‘डेंग्यू’ यांसारख्या आजारांशी करून त्याच्या निर्मूलनाचे आवाहन केले होते. त्यांनी ‘सनातन धर्म जातीव्यवस्था आणि ऐतिहासिक भेदभाव यांवर आधारित आहे’, असे म्हटले होते. या विधानावरून त्यांच्याविरुद्ध अनेक फौजदारी तक्रारी आणि त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट झाल्या होत्या.
परत परत सनातन धर्माचा अवमान करणारे उदयनिधी स्टॅलिन !
अधिवक्त्या सचदेवा यांनी आता प्रविष्ट केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, उदयनिधी स्टॅलिन यांनी १२ मे या दिवशी तमिळनाडू विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात सनातन धर्माचे निर्मूलन करण्याचे पुन्हा आवाहन केले. ‘लोकांमध्ये फूट पाडणारा सनातन धर्म निश्चितपणे नष्ट झाला पाहिजे’, असे त्यांनी म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असतांना आणि न्यायालयाने पूर्वी त्यांच्या विधानांबद्दल अप्रसन्नता व्यक्त केलेली असतांनाही, उदयनिधी यांनी अशाच प्रकारची विधाने करणे चालूच ठेवले आहे. हे न्यायालयीन प्रक्रियेचा जाणूनबुजून केलेला अनादर आहे.
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath