
कोल्हापूर, १६ मे (वार्ता.) – कोल्हापूर जिल्ह्यात येणार्या पुराची नेमकी माहिती कळावी, यांसाठी अत्याधुनिक असे २ ड्रोन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास प्राप्त झाले आहेत. यातील एक हवेतून उडणारा आहे, तर दुसरा पाण्याखाली जाऊन तेथील माहिती गोळा करणार आहे. पाण्याखाली असणार्या ‘ड्रोन’चे साहाय्य प्रामुख्याने पुराच्या काळात पाण्यात असलेले साप, तसेच जलचर यांची हालचाल ओळखण्यासाठी होणार आहे. याचे नियंत्रण जिल्हा व्यवस्थापन केंद्रातून करता येईल अशी व्यवस्था आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती केंद्रातून देण्यात आली.
याच समवेत पुराच्या पाण्यात काम करतांना साप चावला, तरी काही होणार नाहीत असे १२ विशेष कीट (कपडे) जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले आहेत. यामुळे पुराच्या पाण्यात आता सापांची अथवा तत्सम विषारी जलचरांची भीती रहाणार नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने पूर्वी घेतलेल्या ‘हॅम रेडिओ’च्या कक्षेत वाढ करून आता शिरोळ तालुकाही त्यात समाविष्ट करण्यात आला आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान