
मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंक परिसरात दोन अपघात घडले. यात ३ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण घायाळ झाले आहेत. अपघातांमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली. अपघातग्रस्त वाहने हटल्यानंतर संथ गतीने वाहतूक पूर्ववत् झाली.
पहिला अपघात सायंकाळी ५ वाजता ढेकू गावाजवळ मिसिंग लिंक संपणार्या ठिकाणी म्हणजे खंडाळा घाटातील तीव्र उतारावरून येणार्या ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि त्याने पुढील दोन ट्रकला धडक दिली.
ट्रकमधील रंग आणि पुट्टीचा माल पसरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. दुसरा अपघात रात्री परिसरातील बोगद्याजवळ घडला. एक वेगवान बसने पुढे जाणार्या तीन खासगी चारचाकीला मागून जोरदार धडक दिली. चारचाकीचा अपघातात चक्काचूर झाला. गॅस कटरच्या साहाय्याने गाडीचे पत्रे कापून प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात ४ जण गंभीर घायाळ झाले.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !