सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची पाकला चेतावणी

नवी देहली – पाकिस्तानने जर आतंकवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही, तर त्याला ठरवावे लागेल की, त्याला भूभागाचा भाग बनायचे आहे कि इतिहासाचा ? अशी चेतावणी भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकला दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने येथील माणेकशॉ सेंटरमधील सैनिकी कार्यक्रमात बोलतांना जनरल द्विवेदी यांनी ही चेतावणी दिली.
⚠️ “Geography or History?” – Army Chief General Upendra Dwivedi’s Blunt Warning to Pakistan 🇮🇳
In a stern message to Islamabad, Army Chief said that if Pakistan continues sheltering terrorists and operating against India, it must decide “whether it wants to remain part of… pic.twitter.com/tHe66iZAcu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 16, 2026
जनरल द्विवेदी पुढे म्हणाले की,
१. जर पाकिस्तानने त्याची रणनीती पालटली नाही, तर आगामी काळात भारतीय सैन्य ‘ऑपरेशन सिंदूर’पेक्षाही कितीतरी पटींनी अधिक कठोर आणि वेगवान प्रत्युत्तर देईल.
२. पाकिस्तानने शांतता आणि विकास यांचा मार्ग निवडायचा कि आतंकवादाला पाठिंबा देत रहायचे, हे ठरवले पाहिजे. भारताला नेहमीच शांतता हवी आहे; परंतु जर पाकिस्तानने आतंकवाद पसरवणे चालूच ठेवले, तर भारत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पहाणार नाही.
३. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास सैन्य अधिक वेगाने आणि अधिक जोमाने प्रत्युत्तर देईल. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सैन्यदल, वायूदल आणि नौदल यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचे प्रदर्शन झाले. देशात आतंकवादाच्या विरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबले आहे. सैन्य कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहे.
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !