
नागपूर – प्रशासनाच्या तत्परतेमुळे येथील १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखण्यात आला. ‘चाईल्ड हेल्पलाईन १०९८’वर मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केल्याने अपप्रकार टळला. ही मुलगी मूळची गोंदिया जिल्ह्यातील असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील २४ वर्षीय युवकाशी निश्चित झाला होता. ही माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा बाल संरक्षण यंत्रणा आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींनी युवकाच्या घरी भेट दिली. दोन्ही कुटुंबांना बालविवाहाचे शारीरिक, मानसिक आणि कायदेशीर दुष्परिणाम समजावून सांगितले. प्रभावी समुपदेशनानंतर कुटुंबियांनी विवाह स्थगित केला. बालविवाहासारख्या कुप्रथांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सजग राहून अशा घटनांची माहिती तात्काळ प्रशासनाला किंवा ‘१०९८’ या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !
खडक (पुणे) पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोयत्याने ठार मारण्याची धमकी !
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !