
पणजी – गोवा सरकारने सरकारी तिजोरीतून मिळणार्या निधीतून सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी करत असलेल्या सर्व परदेश दौर्यांवर तात्काळ बंदी घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच प्रशासकीय कामांमध्ये काटकसर करण्याचे आणि विचारपूर्वक खर्च करण्याचे आवाहन केले होते. याच आवाहनाची नोंद घेत गोवा सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
१. वित्त विभागाचे अवर सचिव नरेश गावडे यांनी प्रसारित केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पुढील आदेश मिळेपर्यंत कोणत्याही सरकारी निधीतून होणार्या परदेश प्रवासाला अनुमती दिली जाणार नाही.
२. एवढेच नाही, तर ज्या अधिकार्यांच्या परदेश दौर्यांना यापूर्वी अनुमती मिळाली होती, तीही सरकारने मागे घेतली आहे.
३. हे निर्बंध तातडीने लागू करण्यात आले असून सरकारकडून नवीन निर्देश प्रसिद्ध होईपर्यंत ते लागू रहातील.
४. या निर्णयाचा मुख्य उद्देश राज्याच्या तिजोरीवरील भार न्यून करणे आणि सरकारी पैशांचा अपव्यय टाळणे, हा आहे.
५. गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्याने, गोव्याचे पर्यटन खाते जागतिक स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि राज्यात अधिकाधिक परदेशी पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी अनेकदा परदेश दौरे करत असते; मात्र पर्यटन खातेही त्यांच्या धोरणात पालट करतांना देशी पर्यटकांना गोव्यात आकृष्ट करण्यासाठी नीती आखणार आहे. याविषयी पर्यटन खात्याची २० मे या दिवशी बैठक होणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !