सी.एन्.जी. प्रती किलो २ रुपयांनी महागले !
(सी.एन्.जी. म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस – संपीडित नैसर्गिक वायू)
नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेल यांची बचत करण्याचे आवाहन केल्याच्या काही दिवसांनंतर लगेचच पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर प्रत्येकी ३ रुपयांनी महाग झाले आहे. नवीन दर १५ मे पासून लागू झाले आहेत. अनुमाने २ वर्षांनंतर दरांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. आता देहलीमध्ये पेट्रोल ९७.७७ रुपये प्रति लिटरने, तर डिझेल ९०.६७ रुपये प्रति लिटरने मिळेल. याच वेळी सी.एन्.जी. वायूच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
🚨 Fuel Prices Hike – Are We Prepared for the Future?
⛽Petrol & Diesel: Up by ₹3/liter 📈
CNG: Up by ₹2/kg 💨
The Cause: Oil companies face a massive loss of ₹30,000 crores/month. 💸
⚠️ A Wake-Up Call:
With global uncertainties rising, the upcoming times of crisis could… pic.twitter.com/Xuoy8inWzm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 15, 2026
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार होत असल्याने ही वाढ करण्यात आली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध चालू होण्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रती बॅरल (१५९ लिटरचा पिंप) होते, जे आता वाढून १०० डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेले आहेत.
तेल आस्थापनांना प्रतिमहा ३० सहस्र कोटी रुपयांचा होत होता तोटा !
सरकारच्या मते, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांसाखी सरकारी आस्थापने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे तोट्यात चालली होती. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांच्या मते, आस्थापनांना पेट्रोल, डिझेल आणि एल्पीजी यांच्या विक्रीवर प्रतिमहा अनुमाने ३० सहस्र कोटी रुपयांची हानी होत आहे.

काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !