
पुणे – आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर ते मंगळूरू (कर्नाटक) या मार्गावरील भाविकांच्या व्यवस्थापनासाठी, आंबेगाव तालुक्यात विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने पुणे येथे बैठक पार पडली. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार, तसेच अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथील गोरक्षनाथ टेकडीचे मठाधिपती महंत योगी कृष्णनाथजी उपस्थित होते. बैठकीत सुरक्षाव्यवस्था, वाहतूक नियंत्रण, निवास, आरोग्य सेवा, तसेच आपत्कालीन उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली.
कुंभपर्वासाठी लाखो भाविक उपस्थित रहाण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सिद्धता चालू केली असून ते धार्मिक परंपरा जपत भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असल्याचे डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी सांगितले.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !