साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सध्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्ती साधकांच्या श्रद्धेचे भंजन करून त्यांना साधनेपासून परावृत्त करण्यासाठी ‘शब्दशक्ती’द्वारे मोठ्या प्रमाणात सूक्ष्मयुद्ध करत आहेत. लिखाण आणि वाणी यांमधील शब्दांच्या माध्यमातून संस्था, संत आणि साधक यांविषयी नकारात्मकता पसरवली जात असल्याच्या घटना घडत आहेत. या सूक्ष्मातील लढ्यात वाईट शक्ती समाजातील विरोधक, तसेच नकारात्मक विचारांचा प्रभाव असलेले साधक यांना माध्यम करून त्यांचे लिखाण आणि वाणी यांतून अन्य साधकांमध्ये विकल्प निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. साधकाच्या श्रद्धेवर घाव घातला की, त्याच्या मनात विकल्प निर्माण होऊन त्याची साधनेत अधोगती होते.

साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवणार्‍या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींच्या षड्यंत्राला बळी न पडता जोमाने स्वतःची साधना वाढवा !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.३.२०२६)  

सनातन संस्था, सनातनचे संत आणि साधक यांच्याविषयी विकल्प पसरवणारे आक्षेपार्ह लिखाण किंवा बोलणे कुणी करत असल्यास त्याविषयी आपल्या क्षेत्राच्या उत्तरदायी धर्मप्रचारक संतांना कळवावे.

– विश्वस्त, सनातन संस्था.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.