उत्तरप्रदेश : शोएबने सौरभ बनून अल्पवयीन हिंदु मुलीला अडकवले जाळ्यात !

धर्मांतर करण्यास नकार दिल्याने पीडितेचे अश्लील व्हिडिओ प्रसारित !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे शोएब नावाच्या एका मुसलमान तरुणाने ‘सौरभ सिंह’ या नावाने इन्स्टाग्रामवर एक खाते सिद्ध करून त्या माध्यमातून एका अल्पवयीन हिंदु मुलीला जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शोएबला अटक केली आहे.

आरोपी शोएब हा गोंडा जिल्ह्यातील वजीरगंज येथील रहिवासी असून तेथील कर्दा गावात त्याचे स्वतःचे ‘प्रोफेशनल शोएब अख्तर सलून’ नावाचे नाभिक दुकान आहे. त्याने सौरभ नावाद्वारे पीडितेशी ओळख केली आणि नंतर तिच्याशी संबंध ठेवून तिचा अश्लील व्हिडिओ सिद्ध केला. हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणू लागला. पीडित हिंदु मुलीने धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे त्याने मुलीला शिवीगाळ केली. मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केल्यावर त्याने अश्लील व्हिडिओ प्रसारित केला.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !