
पुणे – सामाजिक माध्यमात चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर सामूहिक अत्याचार करणार्या चौघांना २० वर्षे सक्तमजुरी आणि ३५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच्. एम्. भोसले यांनी सुनावली. दंड न भरल्यास आरोपींना एक वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. नोमान खान (वय १९), मनान खान (वय २०), सोहेल पीरजादे (वय २१) आणि मुस्ताक सय्यद (वय ३२) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना देहूरोड परिसरात जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत घडली होती. विशेष सरकारी वकील विजय पाटील यांनी या खटल्यात २२ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कार करणे, अनैसर्गिक कृत्य यांसह विविध कलमाच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !