संभल (उत्तरप्रदेश) येथील सरकारी शाळेत मुसलमान शिक्षक हिंदु विद्यार्थ्यांना देत होते इस्लामी शिक्षण !

  • विद्यार्थ्यांना गोल टोपी, तर विद्यार्थिनींना हिजाब घालण्यासाठी आणला दबाव

  • शिक्षक आणि मुख्याध्यापक निलंबित

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

संभल (उत्तरप्रदेश) – संभल जिल्ह्यातील जालब सराय सरकारी शाळेत २ मुसलमान शिक्षक हिंदु विद्यार्थी-विद्यार्थिनींना इस्लामी पद्धत अवलंबण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे समोर आले आहे. अंजर अहमद आणि महंमद गुल एजाज अशी या शिक्षकांची नावे आहेत. हे दोघे हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना इस्लामी टोपी घालून प्रार्थना करण्यास सांगत असत. तसेच शाळेच्या परिसरात इतर धर्मांविरुद्ध अपमानजनक टिपण्याही करत असत.

१. शाळेच्या संदर्भातील काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यावर ही माहिती उघड झाली. व्हिडिओ समोर आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई केली. जिल्हाधिकारी अंकित खंडेलवाल यांच्या निर्देशांनुसार दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मुख्याध्यापक बालेश कुमार यांच्यावरही कारवाई करत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणाची माहिती उच्च अधिकार्‍यांपासून लपवून ठेवल्याचा आणि निष्काळजीपणा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

२. जिल्हाधिकार्‍यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी मुख्य विकास अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ३ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. ही समिती संपूर्ण प्रकरणाचे अन्वेषण करून या कृत्यात आणखी कुणाचा सहभाग होता ?, याचा शोध घेईल.

३. शिक्षणाच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा धार्मिक किंवा वैचारिक दबाव सहन केला जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट  केले आहे.

संपादकीय भूमिका

  • यापुढे सरकारी शाळांमध्ये जिहादी मानसिकतेच्या लोकांची भरती करू नये, यासाठी भाजपशासित राज्यांनी प्रयत्न केले पाहिजेत !
  • मुसलमान शिक्षक आणि ख्रिस्ती शिक्षक हिंदु विद्यार्थ्यांना हिंदु धर्मापासून दूर करत स्वतःच्या धर्माकडे वळवतात, तर हिंदु शिक्षक धर्मनिरपेक्षतेचे गुणगान गात असतात !