
कोलंबो (श्रीलंका) – देशात एका वरिष्ठ आणि अत्यंत प्रभावशाली बौद्ध भिक्षूला अटक करण्यात आली आहे. ७१ वर्षीय बौद्ध भिक्षू पललेगामा हेमारथाना यांच्यावर ११ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी भिक्षूला कोलंबोमधील एका खासगी रुग्णालयातून अटक केली. मुलीच्या लैंगिक शोषणाची घटना अनुराधापुरा येथील बौद्ध मंदिरात घडली होती, जिथे हेमारथाना मुख्य पुजारी आहेत.
🚨 Senior Sri Lankan Buddhist monk Pallegama Hemarathana Thera arrested over allegations of repeated sexual abuse of a minor girl.
The girl’s mother was also arrested for aiding the abuse.
Arrests involving senior Buddhist monks are extremely rare in Sri Lanka, where the clergy… pic.twitter.com/XoiD16MH17
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 11, 2026
१. या प्रकरणात पीडितेच्या आईलाही अटक करण्यात आली आहे. तिने आरोपी भिक्षूला प्रकरण लपवण्यासाठी सहकार्य केले, असा आरोप आहे. पोलीस दोघांचीही चौकशी करत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने यापूर्वीच आरोपी भिक्षूच्या परदेश प्रवासावर बंदी घातली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की, पुढील कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार केली जाईल आणि आरोपीला लवकरच न्यायालयात उपस्थित केले जाईल.
२. पललेगामा हेमारथाना श्रीलंकेतील सर्वांत प्रभावशाली बौद्ध भिक्षूंमध्ये गणले जातात. भारतातील गया येथील बोधी वृक्षाच्या फांदीपासून श्रीलंकेत एक पवित्र वृक्ष उगवला, अशी तेथील लोकांची श्रद्धा आहे. या पवित्र वृक्षाचे ते मुख्य संरक्षक आहेत. याच बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती, अशी श्रद्धा आहे.
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत