पेशावर (पाकिस्तान) – खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात ९ मेच्या रात्री पोलीस चौकीजवळ एका चारचाकी वाहनामध्ये बाँबस्फोट झाला आणि त्यानंतर गोळीबारही करण्यात आला. यात ३ पोलीस अधिकारी ठार झाले. यासह अनेक जण घायाळ झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेच्या वेळी चौकीत १५ हून अधिक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस अधिकारी जाहिद खान यांनी सांगितले की, एका आत्मघाती आक्रमणकर्त्याने स्फोटकांनी भरलेली गाडी सुरक्षा चौकीजवळ उडवून दिली. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, चौकी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. यानंतर लगेचच बंडखोरांनी गोळीबार चालू केला आणि घटनास्थळी पोचणार्या पोलीस पथकावर दबा धरून आक्रमण केले. अद्याप कुठल्याही संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही.
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद