
कोचीन (केरळम्) : ‘अमृता विश्वविद्यापीठम्’चे संचालक डॉ. यू. कृष्णकुमार यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच सदिच्छा भेट घेण्यात आली. विद्यापीठ परिसरात झालेल्या या भेटीत समितीच्या वतीने श्री. श्रीराम लुकतुके आणि श्री. नंदकुमार कैमल उपस्थित होते. याप्रसंगी समितीच्या वतीने करण्यात येत असलेले धर्मजागृती, ‘लव्ह जिहाद’विरोधी अभियान आणि अन्य राष्ट्र-धर्मरक्षणार्थ चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. कृष्णकुमार यांना देण्यात आली. या वेळी ‘हिंदुत्वाच्या कार्यासाठी आगामी काळात आवश्यक असलेले सर्वतोपरी साहाय्य करीन’, असे आश्वासन डॉ. कृष्णकुमार यांनी दिले.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव !

‘तुम्ही सर्व जण सनातन धर्मासाठी निःस्वार्थपणे पूर्णवेळ जीवन व्यतित करत आहात, हे अत्यंत विरळ उदाहरण आहे आणि आज ही काळाची मोठी आवश्यकता आहे. तुमच्या निःस्पृह कार्यामुळे तुम्ही आम्हाला आमच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वाटता’, अशा शब्दांत डॉ. कृष्णकुमार यांनी समितीचे कार्य आणि साधक यांच्याविषयी आदर व्यक्त केला.
वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. आध्यात्मिक वारसा : डॉ. यू. कृष्णकुमार हे जगद्गुरु माता अमृतानंदमयी देवी यांचे शिष्य असून ते ‘सेवा’ म्हणून या विद्यापिठाच्या संचालकपदाचे दायित्व अनेक वर्षे सांभाळत आहेत.
२. संशोधन कार्याविषयी चर्चा : विद्यापिठामध्ये सध्या चालू असलेल्या ‘इंडियन नॉलेज सिस्टम’ (भारतीय ज्ञान प्रणाली) आणि ‘वेदपठण’ यांसंबंधीच्या शोधकार्याविषयी या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment