(कॉरिडॉर म्हणजे सुसज्ज आणि प्रशस्त मार्ग)

पंढरपूर – काशी आणि उज्जैन कॉरिडॉरच्या आधारे राज्य सरकारने पंढरपूर कॉरिडॉरला मान्यता दिली आहे. यामुळे पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४ सहस्र १५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. या प्रकल्पातून मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांसाठीच्या सुविधा यांचा विकास केला जाणार आहे.
या आराखड्यात पुढील ५० वर्षांचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे. हा प्रकल्प पुढील ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यामध्ये वारकर्यांना स्वच्छ, सुरक्षित, गर्दीमुक्त आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव देणे हा या कॉरिडॉरचा मुख्य हेतू आहे.
या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसरातील प्राचीन मंदिरांचे संवर्धन केले जाणार असून दर्शन व्यवस्थेचे आधुनिकीकरण आणि माहिती केंद्र, संतपीठ, अन्नछत्र, संग्रहालय, भजन-कीर्तन मंडप, पोलीस चौकी, वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवा केंद्र अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत तसेच भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, विद्युतीकरण आणि सौरऊर्जा प्रणाली विकसित केली जाणार आहे.
चंद्रभागा नदी घाट विकासासाठी ४४८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये घाटांचे सुशोभीकरण, स्नानकुंड विकास, स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा आणि मलनि:स्सारण व्यवस्था उभारली जाणार आहे. तसेच शहरातील २२ प्रमुख रस्ते, नवीन पूल आणि ३ ठिकाणी हेलिपॅड (हेलिकॉप्टर उतरण्यासाठी आणि उड्डाणासाठी तयार केलेले सपाट ठिकाण) विकसित करण्याचाही समावेश आहे.
पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी तसेच ६५ एकर आणि ५० एकर पालखीतळ यांच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून या ५ ही पालखीतळांवर स्वच्छतागृहे, पिण्याचे आणि वापरायचे पाणी, भोजन कक्ष आणि विद्युतीकरण सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या कॉरिडॉरमुळे स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून बाधित व्यावसायिक आणि मालमत्ताधारकांचे योग्य पुनर्वसन आणि मोबदला देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे पंढरपूर हे जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !