
सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारातील गट क्र. ७६९ आणि ५७४ हे वर्ष १८८४ पासून ‘राखीव वन’ म्हणून घोषित असलेल्या भूमीवरील दावल मलिक दर्गा परिसरातील सुमारे ५ एकरांवरील अतिक्रमण वन विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढले. (एवढे अतिक्रमण होईपर्यंत झोपलेल्या अधिकार्यांवरही कारवाई हवी ! – संपादक)
ही कारवाई पहाटेपासून सायंकाळपर्यंत चालू होती. अतिक्रमण हटवण्यासाठी ४ जेसीबी, २ ट्रॅक्टर आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या मोहिमेत १८ पत्र्यांच्या टपर्या, पाण्याच्या टाक्या, तसेच पक्की बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही कारवाई गोपनीयता आणि नियोजनबद्धतेने करण्यात आली. या कारवाईत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे, सोलापूर उपवनसंरक्षक कुलराज सिंह, साहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, ऐश्वर्या शिंदे, तसेच तालुका पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्यासह सोलापूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला, पंढरपूर आणि बार्शी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अन् कर्मचारी सहभागी झाले होते. या भूमीवर केवळ धार्मिक विधींसाठी प्रवेशाचा हक्क मान्य होता; मात्र अलीकडील काळात येथे अवैध पत्र्याच्या शेड, टपर्या आणि पक्की बांधकामे उभारण्यात आली होती.
यापूर्वी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडून या अतिक्रमणाचे सूत्र उपस्थित केले होते. त्यानंतर वन विभागाने नोटिसा बजावूनही अतिक्रमण हटवले नसल्याने अंतिम सूचनेनंतर ही कारवाई करण्यात आली.
‘श्री मोरया गोसावी मंदिर’ परिसरातील विक्रेत्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी !
पुणे येथील ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’मधील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या !
झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !
सांगलीसह राज्यातील १२ बाजार समित्यांना ‘राष्ट्रीय बाजारपेठे’चा दर्जा !
शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत